Chhagan Bhujbal | Lok Sabha Election 2024 – नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम असला, तरी या जागेवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी देण्याचे संकेत असल्याचे अनेकदा म्हटले जात होते. पण स्वत: मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत खुलासा केला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकची जागा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागितली. त्यांनी ती जागा तुम्ही घ्या पण तिथून छगन भुजबळ यांनाच उमेदवारी द्या, असे म्हटले आहे. अमित शहांनी असे म्हटल्याचे मला अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले असल्याचा दावाही त्यांनी केला होता. । Chhagan Bhujbal | Lok Sabha Election 2024
दरम्यान, अश्यातच छगन भुजबळ यांनी सर्वात मोठा खुलासा केला असून, ‘नाशिक लोकसभा मतदार संघातून मी माघार घेत असल्याचे’ त्यांनी जाहीर केले. उमेदवार जाहीर होण्यास खुपच उशीर होत आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होऊन, महायुतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपण पूर्णपणे माघार घेत असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.
माझ्यावर विश्वास ठेवून माझे नाव, नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सुचवले त्या बद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मनापासून आभार मानत असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता नाशिकच्या जागेवरून मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. । Chhagan Bhujbal | Lok Sabha Election 2024
अमित शहांच्या बैठकीत झाला होता निर्णय –
महायुतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत चर्चा झाली होती. त्यावेळी आमच्या पक्षाचे नेते अजित पवार यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची मागणी केली. येथून आमचे माजी खासदार समीर भुजबळ लढतील असे अजित पवार यांनी सांगितले होते.
मात्र, तेथून छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवावी अशीच शहा यांचा आग्रह होता. त्यानंतर आम्ही नाशिक मधून चाचपणी केली असता सकारात्मक परिणाम दिसून आल्याची माहिती छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.