संगमनेर – देशाच्या स्वातंत्र्यात व राष्ट्र उभारणीत मोठे योगदान असणाऱ्या काँग्रेस पक्षात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत राहाता तालुक्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर नीलेश यादव, रामदास गिधाड ,नवनाथ गिधाड , सौरभ भाकरे, रविंद्र भाकरे, संजय गिधाड, हरीश गिधाड, प्रमोद गिधाड, विठ्ठल गिधाड, महेश जाधव, अक्षय गोरडे ,शुभम बनसोडे, अविनाश उफाडे ,प्रज्वल आदमाने, आरपीआयचे राहाता उपाध्यक्ष अमोल कोळगे आदींसह समर्थकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
आ. थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्यात अत्यंत समाधानाचे शांततेचे वातावरण आहे .सर्वांना सोबत घेऊन राजकारण होते . शांतता व समृद्धी आहे. बाजारपेठ भरलेली आहे. याउलट तिकडे धाक दडपशाहीचे व दहशतीचे वातावरण आहे. या दहशतीविरुद्ध आता जनता आवाज उठवत आहे.
यावेळी विविध तरुण कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी तालुकाध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, सचिन चौगुले, विक्रांत दंडवते, नितीन सदाफळ, विनायक मते, प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ , मुन्ना फिटर, अमोल आरने, अमोल बनसोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड .लोंढे यांनी केले तर सचिन चौगुले यांनी आभार मानले