जमैका – इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजने आपला १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला. संघात अष्टपैलु आंद्रे रसेलने तब्बल दोन वर्षांनी पुनरागमन केले आहे. ३५ वर्षांच्या रसेलसह निकोलस पूरन व रोमारीयो शेफर्ड यांनीही संघात स्थान मिळवले आहे.
रसेलने २०२१ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी-२० सामना खेळला होता. येत्या बुधवारपासून ही मालिका सुरु होत आङे. या मालिकेत रोवमन पॉवेलकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तर यष्टिरक्षक फलंदाज शाई होप याच्याकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
पूरन आणि होल्डर यांना इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते. या मालिकेत भरीव कामगिरी केलेल्या अष्टपैलू गोलंदाज गुडाकेश मोती याचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
IND vs SA 1st T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना रद्द…
वेस्ट इंडिजचा संघ – रोवमन पॉवेल (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शेमरन हेटमायर, जेसन होल्डर, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काएल मेयर्स, गुडकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड.