नवी दिल्ली – मेक्सिकोमध्यो गुन्हेगारी टोळी आणि मध्ये मेक्सिकोमधील स्थानिक शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये किमान १४ जण ठार झाले.या चकमकीमध्ये चार जण जखमी झाले आहेत आणि दोन जण बेपत्ता झाले आहेत.
या चकमकीचा व्हिडीओए सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक शेतकरी आणि शेतमजूर हातात विळे आणि शिकारीच्या रायफली घेऊन गुंडांचा पाठलाग करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही चकमक राजधानी मेक्सिको सिटीपासून १३० किलोमीटर अंतरावरच्या टेक्सालटिटलन गावामध्ये घडली, असे पोलिसांनी सांगितले.
मृतांमध्ये गुंड टोळीतील ११ जणांचा समावेश आहे. या गुंडांची ओळख पटू शकलेली नाही. या परिसरामध्ये फॅमिलिआ मिचोआकाना नावाच्या टोळीचे प्राबल्य आहे. या गुंडांनी खंडणी वसुलीसाठी लष्करी गणवेशात गावावर हल्ला केला होता. त्यापैकी काही जणांनी हेल्मेटही घातली होती. मरण पावलेल्या गुंडांचे मृतदेह आणि त्यांची वाहने गावकर् यांनी पेटवून दिली.
मेक्सिकोच्या मोठ्या भूभागात अमली पदार्थांची तस्करी करणार् या अनेक टोळ्या सक्रीय आहेत. त्यांच्यामध्ये व,र्चस्वासाठी संघर्ष सुरू असतो.