लंडन :- भारतात सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील सुमार कामगिरीमुळे इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी तब्बल नऊ खेळाडूंना डच्चू दिला आहे. यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंडला गतविजेते असूनही यंदा उपांत्य फेरीतही स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने संघातून 9 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे व नव्या खेळाडूंना संधी दिली आहे.
निराशाजनक कामगिरीनंतरही कर्णधार जोस बटलरसह हॅरी ब्रूक्स, सॅम कुरेन, लियाम लिव्हिंगस्टोन, गस एटिंग्सन, ब्रेडन कार्स यांना संघात कायम ठेवले आहे. तर जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, डेव्हिड मलान, ज्यो रूट, मोईन अली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, आदिल रशीद व रीस टोपले या खेळाडूंना बाहेर काढले आहे.
लेगस्पिन गोलंदाज रेहान अहमद, जॅक क्राउली, बेन डकेट, टॉम हार्टली, विल जॅक, ओली पोप, फिल सॉल्ट यांना एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच एकदिवसीय संघातील काही खेळाडूंना टी-20 संघातही संधी देण्यात आली आहे. त्याच बरोबर सध्याच्या संघातील मोईन अली, आदिल रशीद, ख्रिस वोक्स व रीस टोपले यांना टी-20 संघात कायम ठेवण्यात आले आहे.
#CWC23 #INDvNED : भारतीय संघाने दिवाळीत दिली विजयाची भेट; नेदरलॅंड्सवर 160 धावांनी मात…
एकदिवसीय संघ – जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, गुस एटिंग्सन, हॅरी ब्रूक्स, ब्रायडन कर्स, जॅक क्राउली, सॅम कुरेन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, ओली पोप, फिल सॉल्ट, जोश टंग, जॉन टर्नर.
टी-20 संघ – जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, मोईन अली, गुस एटिंग्सन, हॅरी ब्रूक्स, सॅम कुरेन, बेन डकेट, विल जॅक, लियाम लिव्हिंगस्टोन, टायमल मिल्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जोश टंग, रीस टोपले, जॉन टर्नर, ख्रिस वोक्स.