India vs South Africa 1st T20 2023 : डर्बनमधील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना सततच्या पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे नाणेफेकही (टाॅस) होऊ शकली नाही. सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली होती,मात्र सामना रद्द झाल्यानं प्रेक्षकांना निराश होऊन परतावं लागलं आहे.
दरम्यान, सामन्याशी संबंधित पंच आणि अधिकारी बराच वेळ पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, मात्र सुमारे अडीच तास प्रतीक्षा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार होता. सामन्याचा टाॅस सात वाजता होणार होता.
Not so great news from Durban as the 1st T20I has been called off due to incessant rains.#SAvIND pic.twitter.com/R1XW1hqhnf
— BCCI (@BCCI) December 10, 2023
आता उभय संघांमधला दुसरा सामना 12 डिसेंबरला गेबेरहा येथे होणार आहे. तिसरा आणि शेवटचा सामना 14 डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे होणार आहे.
असा आहे भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा…
टीम इंडिया येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ प्रोटीयाविरुद्ध (दक्षिण आफ्रिका) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा टी-20 आणि वनडे मालिकेत अनुपस्थित आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे आणि केएल राहुल वनडे मालिकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. रोहित शर्मा कसोटी मालिकेतून मैदानात परतणार आहे. विराट कोहलीही येथे टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळत नाही. तो थेट टेस्ट जर्सीमध्येच दिसणार आहे.