भारतामध्ये तुरुंगवासाची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांसाठी पांढऱ्या रंगावर काळ्या रंगाच्या पट्ट्या असलेला गणवेश ठरलेला असतो. आपण अनेक सिनेमांमध्येही बघत असतो त्यामध्येही कैद्यांच्या गणवेशाचा रंग हा काळा- पांढराच असतो. पण तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का, कि या कैद्यांच्या गणवेशाचा रंग काळा-पांढराच का असतो? चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दलची माहिती.
जर एखादा गुन्हेगार तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी ठरला तर त्याला त्याच्या कपड्यांवरुन पोलिसांना ओळखणे सोपे होते. अशा पद्धतीचे कपडे सामान्य व्यक्ती कधीच परिधान करत नाहीत. त्यामुळे गर्दी असतानाही कैद्याकडे सहजपणे लक्ष जाते. कधीकधी सर्वसामान्य लोकदेखील कैद्यांचे कपडे पाहून पोलिसांना माहिती देतात.
तसेच भारतातील तुरुंगांमध्ये पंखा, कूलर अशा कोणत्याही व्यवस्था नसतात. कैद्यांना उकडत असतानाही गरम वातावरणामध्येच झोपावे लागते. उन्हाळ्यात हा त्रास वाढत जातो. अन्य रंगांच्या तुलनेमध्ये पांढरा रंग हा कमी प्रमाणात उष्णता शोषून घेत असतो. म्हणून कैद्यांच्या गणवेशाचा रंग हा काळ्या- पांढऱ्या रंगाचा ठरलेला असतो.