नवी दिल्ली – मुसळधार पावसामुळे जम्मू-काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेतील बाबा बर्फानीच्या दर्शनावर सध्या बंदी घालण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाने माध्यमांना सांगितले की, खराब हवामानामुळे बालटाल आणि पहलगाममध्ये यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. हवामान स्वच्छ झाल्यानंतरच यात्रेकरूंना जाण्यास परवानगी दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्राही थांबवण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेचे मार्ग बंद करण्यात आले आहेत, या भागात लँड स्लाईडचा धोका वाढला असून बाबा अमरनाथ धामला जाणारे यात्रेकरू थांबले आहेत.
#WATCH | Maharashtra: Mumbai wakes up to severe waterlogging in the aftermath of heavy rains lashing the city.
(Visuals from Andheri Subway) pic.twitter.com/wcGjcMRdoR
— ANI (@ANI) July 5, 2022
महाराष्ट्रात मुंबईमध्ये पुढील काही दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईत येत्या शुक्रवारपर्यंत ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. येत्या ५ दिवसांत मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे आयएमडीने आपल्या अंदाजात म्हटले आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची टीम मुंबईत आपत्ती टाळण्यासाठी आधीच तैनात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला याप्रकरणी सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
याआधी सोमवारी मुंबईत मुसळधार पाऊस झाला, या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सुमारे 12 तास पाऊस पडला, कुलाबा वेधशाळेने सांगितले की, मुंबईत 66.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सांताक्रूझ येथे 40.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याचवेळी ठाणे आणि नवी मुंबईत काही काळ जोरदार पाऊस झाला. मुंबईतील अनेक भागात रात्रीही पाऊस झाला.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, ‘मुख्यमंत्र्यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे. रत्नागिरी, रायगड, चिपळूण, आणि मुंबईसह अनेक भागात एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.’
जाऊन घ्या दिल्लीचे हवामान
दुसरीकडे, राजधानी दिल्लीच्या हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास, आज दिल्लीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारपासून दिल्लीत मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMD ने मंगळवारी दिल्लीत ढगाळ वातावरणाचाअंदाज वर्तवला आहे. आयएमडीने म्हटले आहे की दिल्लीत आज कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
पुढील 4-5 दिवसांत या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 4 ते 5 दिवसांत गुजरात व्यतिरिक्त केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि कोकण किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस आणि वादळाची शक्यता आहे.