Weather Forecast : देशातील डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी (Snowfall) सुरु झाल्यामुळे मैदानी भागात कडाक्याची थंडी (Cold Weathers) पडली आहे. एकीकडे थंडीचे वातावरण असून दुसरीकडे आज देशातील 6 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा (Unseasonal Rain) इशारा (IMD Alert) देण्यात आला आहे. आज आणि उद्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 तासांत तामिळनाडू, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेश आणि दक्षिण राजस्थानमध्ये गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडेल. 27 नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे.
आज पहाटेपासून तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे चेन्नईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक राज्यात पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पर्वतीय भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पर्वतीय भागातील बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडी हळूहळू वाढणर आहे. तर, डिसेंबरची सुरुवात कडाक्याच्या थंडीने होऊ शकते.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय राजस्थानमधील 6 जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून त्यात चित्तोडगड, सिरोही, उदयपूर, बारमेर, जालोर आणि पाली या जिल्ह्यांचा समावेश आहे.