Amitabh Bachchan: बॉलीवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. आजही त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. वयाची 80 वर्ष ओलांडलेल्या अमिताभ बच्चन यांचा कामामधील उत्साह आजही कायम आहे. सोशल मीडियावर देखील ते सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या विविध पोस्टमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा रंगली आहे. बिग बींनी जुहूमधील आलिशान बंगला मुलगी श्वेता बच्चनच्या नावे केला आहे.
जुहूमधील या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. अमिताभ बच्चन यांच्याजवळ मुंबईत तीन आलिशान बंगले आहे, त्यापैकीच एक त्यांनी मुलीला दिला आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांनी त्यांची मुलगी श्वेता नंदा (Shweta Nanda) हिला मुंबईतील जुहू येथील ‘प्रतिक्षा’ हा बंगला भेट म्हणून दिला आहे. या बंगल्याची किंमत अंदाजे 50 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हा बंगला 9585 स्क्वेअर फूट इतका आहे. मात्र याबाबत अद्याप बच्चन कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
बच्चन कुटुंबीय 1976 पासून ‘प्रतिक्षा’मध्ये राहत आहेत. त्यांचे ‘जलसा’ आणि ‘जनक’ हे सुद्धा बंगले आहेत. श्वेताबद्दल सांगायचे झाले तर, श्वेता बच्चन नंदा एक रायटर असून एक्स मॉडेल आणि बिझनेसवुमन सुद्धा आहे. श्वेता बच्चन यांची ‘पॅराडाईज टॉवर्स’ ही कादंबरी सर्वाधिक विकली गेलेली कादंबरी आहे. तर दुसरीकडे, अमिताभ बच्चन यांचे ‘सेक्शन 84’ आणि ‘कल्की 2898 एडी’ मधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.