मुंबई – ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहे, ते उत्तम लेखक होते. त्यांनी जे लिहून ठेवले आहे त्यातील शिवानी वडेट्टीवार बोलल्या असतील. आणि जर असे काही लिहिलेले नसेल तर नक्कीच त्या माफी मागतील.’ अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी दिली आहे.
बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून समर्थन देणारे सावरकर हिंदूचे प्रेरणास्थान कसे ? pic.twitter.com/NAjdfowViC
— Shivani Wadettiwar (@SVW790) April 13, 2023
दरम्यान, प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका कार्यक्रमात बोलतांना शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या,’बलात्कार हे राजकीय शस्त्र असून हे शस्त्र तुम्ही आपल्या राजकीय विरोधात वापरले पाहिजे, असे सावरकरांचे विचार होते.’ यामुळे महिलांना भीती वाटत असते.. या व्हिडीओमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उपस्थित लोकांसमोर त्या आक्रमकरित्या आपले विचार मांडताना दिसून येत आहे.’
दरम्यान, त्यांच्या या विधानावर आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सात्यकी सावरकर यांनी शिवानी वडेट्टीवार यांना ओपन आव्हान दिलं आहे. “शिवानी वडेट्टीवार यांनी केलेला दावा चुकीचा आहे. सावरकरांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांनी तसं स्टेटमेंट शोधून दाखवावं”, असं चॅलेंज सात्यकी सावरकर यांनी दिलं आहे.