मुंबई-: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. मग कधी तो मॅच प्रॅक्टिस करतानाचे आपले फोटो शेअर करतो तर एखाद मिम देखील पोस्ट करतो. नुकताच रोहितने त्याच्या इंस्टावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.ज्यात तो बॉलीवूड अभिनेता संजय दत्तच्या ‘वास्तव’ चित्रपटातील लुक मध्ये दिसत आहे.
यावेळी रोहितचा हटके अंदाज सर्वांना पाहायला मिळाला आहे. या व्हिडिओमध्ये रोहितच्या गळ्यात २ सोन्याच्या जाड चैन, हातात सोन्याचं ब्रेसलेट दिसंतय. याशिवाय त्याने अगदी राजकारण्यांप्रमाणे कपडे घातलेले पहायला मिळताहेत. यासोबतच व्हिडिओच्या बॅग्राऊंडला ‘पचास तोला’ असा डायलॉगही ऐकायला मिळतोय.
चैन आणि गॉगल व्यातिक्रित यावेळी रोहित कडक जॅकेट आणि स्टायलिश कुर्त्यामध्ये आहे. त्याचा हा लुक अगदी एखाद्या श्रीमंत पॉलिटिशियन प्रमाणे वाटत आहे. म्हणूनच रोहितच्या या वेगळ्या अंदाजामुळे तो राजकरणात प्रवेश करणार कि काय ? अशी देखील चाहत्यांनी शंका उपस्थित केली आहे.रोहितचा हा निराळा अंदाज मात्र चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
View this post on Instagram
रोहित शर्माचा हा लूक एका जाहिरातीच्या शुटिंगदरम्यानचा आहे. रोहितने त्याच्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी हा व्हिडिओ शेअर केला आहे. एरवी रोहितला मैदानात फटकेबाजी करताना पाहून टाळ्या वाजवणाऱ्या चाहत्यांनी त्याच्या या नव्या लूकवर असाक्षरशः कॅमेंटचा पाऊस पाडला आहे. रोहित शर्मा सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. मात्र त्याने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.