लेक आणि जावयांसाठी आम्ही काम करत नाही; सीतारामन यांचे राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याला सडेतोड उत्तर

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. ते सरकार म्हणजे हम दो, हमारे दो अशी स्थिती आहे. सध्या देश फक्त चार लोक चालवतात, असा आरोप त्यांनी केला होता. यावर आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले.

निर्मला सीतारामन म्हणाल्या कि, हम दो, हमारे दो म्हणजे दोन लोक पार्टीची काळजी घेतायेत आणि आणखी दोन लोक आहेत ज्यांची काळजी आम्हाला घ्यायची आहे….मुलगी आणि जावई, असा त्याचा अर्थ होतो. परंतु आम्ही असे करत नाही.

सर्वसाधारण अर्थसंकल्प क्रोनी कॅपिटालिस्ट केंद्री असल्याचा आरोप करत विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. सीतारामन यांनी विरोधकांचा आरोप खोडून काढला केला. स्वनिधीचा पैसे क्रोनीजल जात नाही. जावयांना अशा राज्यांमध्ये जमिनी भेटत होत्या. जेथे त्यांचे आधी शासन होते. राजस्थान, हरियाणा मध्ये आधी असे होत होते. 

अर्थसंकल्प गरीबांना मदत करणारा आहे. अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीला गती मिळणार आहे. यासाठी आम्ही काम करतो. कोणत्याही जावयासाठी नाही, अशी टीका सीतारामन यांनी केली आहे. 

काँग्रेसवर हल्ला चढवत निर्मला सीतारामन म्हंटल्या कि, शशी थरूर येथे उपस्थित आहेत. केरळमध्ये ज्यावेळी त्यांच्या पक्षाचे सरकार होते. या लोकांनी कोणतेही टेंडर नसताना क्रोनीला तेथे बोलविले होते.  आणि हे लोक आम्हाला कॅपिटालिस्ट म्हणतात? आमच्यासाठी जनताच क्रोनी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.