पुजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर भाजपने शिवसेनेच्या एका मंत्र्याचा यात हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या काही ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे प्रकरण अजूनच तापले. या प्रकरणावरुन बीडच्या माजी माजी पालकमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चौकशीची मागणी केली आहे.
पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरूणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. हया तरूणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे ..@CMOMaharashtra@AnilDeshmukhNCP @DGPMaharashtra
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 11, 2021
पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, ‘पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरूणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. हया तरूणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे.’