पिंपरी – वाल्हेकरवाडी येथे थेरगाव ग्रॅव्हीटी लाईन अचानक शुक्रवारी (दि.26) सायंकाळी लिकेज झाल्याने सेक्टर 23 हून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्याचा थेट परिणाम शहराच्या विविध भागांत होणार्या पाणीपुरवठ्यावर झाला. परिणामी वाकड , थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, सांगवी या परिसरात प्रजासत्ताकदिनी पाण्याचा ठणठणाट पहायला मिळाला. हजारो नागरिकांना याचा फटका बसला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची वाल्हेकरवाडी येथे थेरगाव ग्रॅव्हीटी लाईन अचानक शुक्रवारी (दि.26) सायंकाळी लिकेज झाली. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा तातडीने रोखण्यात आला. परिणामी नागरिकांना पाण्याची टंचाई भासली. या घटनेनंतर पाणीपुरवठा विभागाच्या वतीने शनिवारी (दि.27) सकाळी या लिकेज पाइपलाईची दुरूस्ती करण्यात आली.
त्यामुळे या भागात होणारा पाणीपुरवठा विस्कळीत व कमी प्रमाणात होता. पाणी पुरवठा विभागामार्फत हे कामकाम तातडीने करण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी संध्याकाळी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.