शिवरत्न नॉलेज सिटी विकसित भारत रॅली ः प्रजासत्ताक दिन व स्नेहसंमेलन झील २०२४ चे उद्घाटन
अकलूज – अकलूज नगर परिषद व विविध महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने महाभारत शासनाच्या डिजिटल इंडिया योजनेची माहिती दिली. लोकांपर्यंत ही माहिती डिजिटल इंडियाचे स्वरूपचा चित्ररथ उभारला असून, त्या माध्यमातून विविध आशय परियोजना मांडण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून पाच लाख लाभार्थ्यांनी वैद्यकीय विमा देण्यात येतो. स्टार्ट अप इंडिया या योजनेचा चित्ररथ देखील विद्यार्थ्यांनी उभारण्यात आला आहे.
ग्रामीण शहरी भागातील नागरिकांना भारत सरकारच्या योजनांची माहिती व्हावी, त्यांना त्याचा लाभ मिळावा या विकसित भारत यात्रेमध्ये केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. शेतकऱ्यांना व जनसामान्यांना निराशा होणार नाही, यासाठी योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी रॅलीच्या माध्यमातून काम करण्यात आले. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी रथयात्रेच्या माध्यमातून जनजागृती केली .
अकलूज येथील शिवरत्न नॉलेज सिटीतील ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी, विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग मेडिकल रिसर्च व शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विकसित भारत संकल्पेवर आधारित चित्ररथ तयार केला. गांधी चौक, सदुभाऊ चौक, प्रतापसिंह चौक, महर्षी चौक, शिवरत्न बंगला व शिवरत्न नॉलेज सिटी या मार्गावर प्रजासत्ताक दिन व झील वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
मोटार सायकल रॅलीचे उद्घाटन ग्रीन फिंगर्स महाविदयालयीन विकास समिती अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांनी झेंडा दाखवून केले. या प्रसंगी शिवरल नॉलेज सिटी आयोजित झील २०२४ चे उदघाटन शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी विविध महाविद्यालयीन विकास समिती सदस्य, पदाधिकारी प्राचार्य विभाग प्रमुख विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते