पिंपरी, (वार्ताहर) – सोहम सार्वजनिक ग्रंथालय तथा अभ्यासिका यांच्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून संत तुकारामनगर येथे या सन्मानाचे आयोजन केले होते.
सोहम सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रमुख जगन्नाथ नेरकर यांच्या हस्ते प्रा. संपत गर्जे यांचा सन्मान करण्यात आला. संपत गर्जे यांच्या शैक्षणिक, आध्यात्मिक व सामाजिक कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
या वेळी जगन्नाथ नेरकर यांनी सोहम ग्रंथालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला. ग्रंथालयातील अभ्यासिकेत अभ्यास करून 100 च्या वर विद्यार्थी मोठमोठ्या पदावर विराजमान झाले हेच सोहम सार्वजनिक ग्रंथालयाचे यश आहे, असे नेरकर यांनी सांगितले.
या वेळी सत्काराला उत्तर देताना गर्जे म्हणाले की, सोहम ग्रंथालयाच्या वतीने पुरस्कार मिळाला हा मी माझा बहुमान समजतो. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी सोहम ग्रंथालयातील पुस्तकांचा आपल्या अभ्यासासाठी भरपूर उपयोग करावा. तारुण्याचे तीन ‘त’कार तेजस्वीता, तपस्वीता आणि तत्परता विद्यार्थ्यांनी जपावेत, असा मौलिक सल्ला अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना दिला.