IPL 2024 (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders, Match 51) :- आज (शुक्रवार) आयपीएल 2024 चा 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने-सामने होते. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 24 धावांनी पराभव केला. मुंबईच्या या पराभवामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. त्याचबरोबर केकेआरच्या खात्यात 14 गुण आहेत. श्रेयस अय्यरचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून प्लेऑफसाठी पात्र होण्याच्या मार्गावर आहे. मुंबई -0.356 नेट रन रेटसह नवव्या स्थानावर आहे.
कोलकाताने प्रथम खेळून 169 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 18.5 षटकांत 145 धावा करून सर्वबाद झाला.170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्ये एमआयने 46 धावांवर तीन गडी गमावले. इशान किशन 13, नमन धीर आणि रोहित शर्मा 11-11 धावा करून बाद झाला. या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने स्फोटक कामगिरी केली. त्याने 35 चेंडूत 56 धावा केल्या. 360 डिग्री फलंदाजाने 30 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे 24 वे अर्धशतक ठरले.
तर टीम डेव्हिडने 24 धावा केल्या. मुंबईतर्फे तिलकने चार, नेहलने सहा, पांड्याने एक, गेराल्डने आठ, पियुषने शून्य आणि जसप्रीतने (नाबाद) एक धावा केल्या.मिचेल स्टार्कने 19व्या षटकात तीन बळी घेतले. त्याने टीम डेव्हिड, पियुष चावला आणि जेराल्ड कोएत्झी यांना बाद केले. या सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या. तर वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकात सर्वबाद 169 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला कोलकाता नाईट रायडर्सचे आघाडीचे फलंदाज मुंबई इंडियन्सविरुद्ध संघर्ष करताना दिसले. 57 धावांवर संघाने पाच विकेट गमावल्या. मुंबईच्या मारक गोलंदाजीसमोर सॉल्ट-नरीनसारखे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. या सामन्यात सॉल्ट पाच धावा, रघुवंशी 13 धावा, श्रेयस अय्यर सहा धावा, सुनील नरेन आठ धावा आणि रिंकू सिंग नऊ धावा करून माघारी परतला.
Innings Break!#KKR set a 🎯 of 1️⃣7️⃣0️⃣ with a crucial partnership between Venkatesh Iyer & Manish Pandey 🎯
Will it be defended or can #MI register a win at home? 🤔
Scorecard ▶️ https://t.co/iWTqcAsT0O#TATAIPL | #MIvKKR pic.twitter.com/rSbZ9eSMTC
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2024
यानंतर मयंक पांडे आणि व्यंकटेश अय्यर यांनी संघाची धुरा हाती घेतली. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 62 चेंडूत 83 धावांची भागीदारी झाली. प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या मनीष पांडे याला हार्दिक पांड्याने बाद केले. तो 42 धावा करून परतला. कोलकाताला 17 व्या षटकात दोन धक्के बसले. या षटकात आंद्रे रसेलला केवळ सात धावा करता आल्या.
या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या. वानखेडे स्टेडियमवर त्याने 50 विकेट पूर्ण केल्या. त्याने रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क आणि व्यंकटेश अय्यर यांना बाद केले. अय्यरने मुंबईविरुद्ध 52 चेंडूत 70 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि तीन षटकार आले. मुंबईतर्फे नुवान तुषाराने तीन, कर्णधार पांड्याने दोन आणि पियुष चावलाने एक विकेट घेतली.