मुंबई : राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियायावर सतत ऍक्टिव्ह असतात. याद्वारे त्या आपले मत स्पष्टपणे मांडत असल्याचे आपण अनेकवेळा पाहिले आहे. दरम्यान, अमृता फडणवीस यांनी याच सोशलमिडीयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. काल मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरीत्या अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली होती त्याच टीकेला आता अमृता फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
महाउत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला होता. मला वाटले आजपर्यंत एकच व्यक्ती गाते असा टोला नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी लगावला होता. यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी एक ट्विट करून मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे.
मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अबजाधीश फक्तं आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा आब्जाधीशच आहे !
छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात !! @OfficeofUT pic.twitter.com/UsEXftApk1— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 2, 2022
यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अब्जाधीश फक्तं आपणच आहात. आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे. छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात, असे म्हटले अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टॅग देखील केले आहे.
अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर बोलताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की, “ठाकरे कुटुंबावर बोलल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. आम्ही याकडे जोक म्हणून बघतो. आम्ही अशा चिरकुट लोकांकडे बघतही नाही”, असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.