Lok Sabha elections 2024 । लोकसभा निडणुकीतील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडले. अशात भाजप पक्षाला प्रचारावरून विरोधक निशाणा साधत आहे. तर दुसरीकडे भाजपनेते आणि माजी केंद्रीय मंत्रांकडून सुद्धा मोदी सरकारवर मतांसाठी एवढी खालची पातळी गाठलेला पंतप्रधान कधी पाहिला नाही, अशी टीका करण्यात आली आहे.
I have watched Indian Prime Ministers since Nehru’s time and worked closely with two. Never before have I seen a PM descend so low as the present one to get votes.
— Yashwant Sinha (@YashwantSinha) April 26, 2024
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी ट्विट करत टीका केली आहे की,’मी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून भारतीय पंतप्रधान पाहिले असून यापैकी दोघांसोबत जवळून कामही केले आहे. पण आज मतांसाठी एवढी खालची पातळी गाठलेला पंतप्रधान यापूर्वी कधीही पाहिला नाही’ असेही ते म्हणाले आहे.
प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते कि,‘काँग्रेस सत्तेवर आली तर हिंदूंची संपत्ती ते जास्त मुले असलेल्यांना वाटतील. तुमची मंगळसूत्रेही खेचली जातील’, असे मोदी राजस्थानमधील सभेमध्ये बोलले होते. त्यांच्या या विधानाचा विरोधकांनी खरपूस समाचार घेतला. याच मुद्द्यावरून आता माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनीही नाव न घेता मोदींवर टीका केली आहे.
हे वाचले का ? आपसोबत युती केल्याने दिल्लीत काँग्रेसला गळती, अरविंदर सिंग लवली यांनी सोडले अध्यक्षपद