वाघोली : कोरोनाची परिस्थिती व सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पोलिसांच्या वतीने वाघोली येथे सोशल डीस्टन्सिंग पाळून पथ संचलन घेण्यात आले.
केसनंद फाटा येथील पोलीस चौकीतून पथ संचालानास सुरुवात झाली. आव्हाळवाडी फाटा, गावठाण, वाघेश्वर मंदिर, पुणे महामार्गावरून केसनंद फाटा येथे संचलन करण्यात आले. मास्क लावून, सोशल डीस्टन्सिंग पाळून पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यामध्ये सहभागी झाले होते. कोरोनाची व्याप्ती गांभीर्याने लक्षात घेऊन नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच जीवनावश्यक वस्तूंसाठी सतत रस्त्यावर येऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.