हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली लोकसभा निवडणुकीत नव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठा उत्साह दाखविला. यातच हिंगोली विधानसभा मतदार संघात बोहल्यावर चढण्या अगोदर नवरदेवाने आपले लोकशाहीचे कर्तव्य बजावले. त्याच्या या कृतीचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
सेनगाव तालुक्यातील उटी (ब्रम्हचारी)नवरदेव गोपाल पोहकर यांचा विवाह आज दि 26/04/204 रोजी उटी ब्रम्हचारी येथील विवाह सोहळा अमला येथे लागायला जात आहे होता त्या आधी नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केंद्रावर जाऊन गोपालने मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानासारख्या मौलीक अधिकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना चांगलेच उदाहरण देवून.लोकशाहीचा उत्सव साजरा केल्याची सर्वत्र कौतूकाने चर्चा होत आहे.
लग्न म्हन्टले की, नवयुवक व युवतींना आनंदाची पर्वणी असते. परंतू त्याचबरोबर नागरिक म्हणून देशाच्या विकासाचा कणा असलेल्या लोकशाहीत आपले प्रतिनिधी मतदान करुन संसदेत पाठवणे हे ही मोठे कर्तव्यच, याचे भान सर्वानी ठेवणे गरजेचे आहे.
लोकसभा निवडणुकीत हिंगोली विधानसभा मतदार.संघातील उटी (ब्रम्हचारी)येथे नव वर गोपाल पोहकर गजानन डव्हले यांना सोबत घेवून मतदान केंद्र क्र. 64 वर जावून मतदानाचा हक्क बजावला. या नव दांपत्यासाठी आजचा दिवस लग्नाचा व मतदानाचा आयुष्यभर अविस्मरणीय राहिल.