मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिच्या ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटातील आयटम साँग ‘ऊ अंटावा’ची क्रेझ सध्या सर्वीकडे बघायला मिळत आहे.
Mood 😎 @imVkohli @RCBTweets #IPL #IPL2022 #ViratKohli #CricketTwitter #RCB #PlayBold pic.twitter.com/pWwYYSFFq0
— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) April 27, 2022
समांथा रुथ प्रभूने या गाण्यावर केलेल्या हुक स्टेपवर तिच्या चाहत्यांनी अनेक रील बनवत सोशल मीडियावर शेअर केले आहे. या गाण्याने सोशल चांगला धुमाकूळ घातला असून कोणत्याही पार्टीमध्ये ते आयटम साँग हमखास वाजवले जाते.
यातच सोशलवर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये आरसीबाीचा माजी कॅप्टन विराट कोहली या गाण्यावर थिरकतांना दिसून येत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ आरसीबीचा ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेलने दिलेल्या पार्टीतील आहे. मॅक्सवेलच्या लग्नाला 27 एप्रिल रोजी एक महिना झाला. त्यामुळे आरसीबीच्या खेळाडूना पार्टीचं दिली. या पार्टीमध्ये पुष्पामधील समांथाच्या ‘ऊ अंटावा’ गाण्यावर सर्व क्रिकेटर थिरकतांना दिसून आले. सध्या सोशलवर हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. विराटच्या डान्सचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.