मुंबई – सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती बघता महाराष्ट्रात रोज काहीतरी नवीन घडताना दिसून येत आहे. नवनीत राणा प्रकरण, मनसेचं भोंगे आंदोलन यामुळे आता महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे.
आणि अश्यातच शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री ‘उद्धव ठाकरे’ यांनी उद्या (दि. २९) मातोश्रीवर संध्याकाळी एक मोठी बैठक बोलावली आहे. उद्या संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास ही बैठक होणार आहे.
दरम्यान, या बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सर्वच्या सर्व खासदार देखील उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजकारणात सक्रिय झाल्यानंतरची शिवसेनेची ही पहिलीच बैठक आहे. उद्याच्या या महत्वपूर्ण बैठकीत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक चर्चा होणार आहे.
तर, दुसरीकडे पाहिला गेलं तर मनसे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ देखील राज्यात सभा घेत पक्ष कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम करत आहेत. औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर येत्या १ मे रोजी राज ठाकरे जाहीर सभा घेऊन मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत.