नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन काही दिवसांपूर्वी झालंय. विराट आणि अनुष्काला कन्यारत्नाचा लाभ झालाय. कोहलीसाठी ही त्याच्या आयुष्यातील सर्वात ‘गोड’ बातमी ठरली आहे. याबाबतची माहिती विराट कोहली याने सोशल मीडियाव्दारे दिली . यातच विराटने सोशलवर पुन्हा एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्यांच्या मुलीचे फोटो काढू नये अशी विनंती फोटोग्राफरला केली होती.
View this post on Instagram
यातच त्यांनी आता इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की,‘आम्ही एकमेकांसोबत आजवर सुखशांती, साथ संसार करत आलोय. पण या छोटुकलीने, वामिकाने, आम्हाला वेगळ्याचं जगात नेलंय! काही क्षणात आम्हाला अश्रू, हास्य, काळजी, आनंद अशा वेगवेगळ्या भावनांचा प्रवास घडतो. झोप अजूनही दुर्मिळच आहे, पण आमची हृदय आनंदाने भरलेली आहेत. तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना, सकारात्मक उर्जा शुभेच्छांसाठी धन्यवाद.! अशी पोस्ट शेअर करत अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या मुलीटं नावं वामिका असं ठेवलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान, सोशलवर त्यांना मुलगी होताच अनेक खोट्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या त्यामुळे त्यांनी ही पोस्ट लिहत सोशल मीडिया युजर्सला काही दिवसांपूर्वी विनंती केली होती.