जेव्हा सीतारामन यांनी मामीनं दिलेल्या लाल रंगाच्या कापडात गुंडाळून आणलं बजेट…

ब्रीफकेस ही इंग्रजांची देणं आणि मला ते पसंत नाही

नवी दिल्ली – प्रत्येक देशातील सरकार दरवर्षी आपला अर्थसंकल्प सादर करत असते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज भारताचा 2021 -22 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करीत आहे. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात झाली. कोरोनामुळे आधीच हैराण झालेल्या जनतेला या बजेटकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे सरकार सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी काय करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अर्थसंकल्प म्हंटल कि चटकन आपल्या डोळ्यांसमोर अर्थमंत्र्याच्या हातातील ब्रिफकेस येते. ब्रिटिश काळापासून या ब्रिफकेसची परंपरा चालत आली आहे. मात्र, 2020 पासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही परंपरा मोडीत काढत लाल रंगाच्या चोपडीतून अर्थसंकल्प आणण्यास सुरवात केली. यावेळी लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून आणलेला अर्थसंकल्प बघून निर्मला सीतारामन यांना अनेक प्रश्नोत्तरांचा सामना करावा लागला होता. ‘ब्रीफकेस किंवा सुटकेस ही इंग्रजांची देणं असून, मला ब्रीफकेस पसंत नसल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

अर्थमंत्र्यांनी आणलेल्या या लाल चोपडीवर सोनेरी रंगाचे अशोक चिन्ह बनवले होते. यासह एका सोनेरी रंगाच्या फितीत हे बजेट होते. विशेष म्हणजे ज्या लाल कापडात त्यांनी बजेट सादर केले होते. हे कापड निर्मला यांना त्यांच्या मामीनं गिफ्ट केले होते. त्यावर हळदी, कुंकू आणि चंदनानं शुभ लाभ लिहिण्यात आलं होतं. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. मात्र यंदाचा 2021 -22चा अर्थसंकल्प लाल रंगाच्या चोपडीतून नव्हते तर ‘मेड-इन-इंडिया टॅबलेटद्वारे’ सादर करण्यात आला. 

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.