नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2021 -22 या वर्षासाठीचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटचे शेअर बाजाराने जोरदार स्वागत केले असून सेन्सेक्सने उसळी घेतली आहे.
बजेट सादरीकरणाच्या पहिल्याच तासात शेअर बाजार २ टक्क्यांनी वधारला. अर्थमंत्र्यांच्या भाषणाची सांगता होईपर्यंत BSE मार्केट कॅप १९०.४३ कोटींपर्यंत पोचल्याने गुंतवणूकदार ४.३ लाख कोटींनी श्रीमंत झाले.
इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एम अँड एम, एचडीएफसी या शेअर्सच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने निफ्टी चांगलाच वधारला. आज दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत निफ्टीमध्ये ५४९.५० अंकांची वाढ होत तो १४,१८४.१० वर जाऊन पोचला.
आज निफ्टी-५० मधील ४४ भागीदार कंपन्यांचे शेअर्स वधारले तर ६ शेअर्सचे भाव कोसळले.