नवी दिल्ली – अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाइट हाऊस आणि संसद भवनात मोठा धुडगूस घातला. यावेळी झालेल्या गोळीबारात एक महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, यानंतर वॉशिंग्टनमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले कि, वॉशिंग्टन डी. सी. मधील दंगल आणि हिंसाचाराच्या बातम्या पाहून अस्वस्थ झालो आहे. व्यवस्थित आणि शांततेत सत्ता हस्तांतरण सुरूच राहिले पाहिजे. बेकायदा निषेधाच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेला डाग लागू दिला जाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
Distressed to see news about rioting and violence in Washington DC. Orderly and peaceful transfer of power must continue. The democratic process cannot be allowed to be subverted through unlawful protests.
— Narendra Modi (@narendramodi) January 7, 2021
दरम्यान, जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच ट्रम्प यांचे समर्थक इमारतीबाहेर उपस्थित होते. सुरक्षा असतानाही ट्रम्प समर्थकांनी कर्फ्यूचे उल्लंघन करत आंदोलकांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली आणि इमारतीत प्रवेश केला. आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यामध्ये एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला आहे