तरुणांनी उद्योग, व्यवसाय सुरू करावेत; खासदार सुप्रिया सुळे यांचे आवाहन

बावधन – मराठी माणूस व्यवसायात प्रगती करतो ही अभिमानाची गोष्ट आहे. व्यवसायात सर्वांची साथ मिळाली तर यश नक्की मिळते. तरुणांनी केवळ नोकरी मिळवण्याचा उद्देश न ठेवता स्वत:चे उद्योग, व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक व प्रगतशील शेतकरी दिलीप दगडे यांनी सुरू केलेल्या याकोआमा टायर शोरूमच्या उद्‌घाटनप्रसंगी सुळे बोलत होत्या.

यावेळी शोरूमचे व्यवस्थापकीय संचालक सागर दगडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, मुळशी पंचायत समिती सभापती महादेव कोंढरे, शंकर केमसे, सुनील चांदेरे, योकोआमा कंपनीचे संजय चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते.

या कंपनीचे हे पुण्यातील तिसरे शोरूम असल्याचे सागर दगडे यांनी सांगितले. दगडे परिवाराने अत्याधुनिक उपकरणाच्या माध्यमातून शेतीव्यवसायात प्रगती केली. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी विविध व्यवसायात पाऊल टाकत, यश मिळविले, ही बाब कौतुकास्पद असल्याचे सुळे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.