Vasant More । मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. मराठी माणसाच्या हक्काचा विषय असो वा एखाद्याला मदत करणं असो मोरे आपली प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून देत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग असून, त्यांची प्रत्येक पोस्ट नेहमीच ते चर्चेत असते. अशात त्यांची सोशल मीडियावर पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
साहेब मला माफ करा अशी पोस्ट शेअर करत वसंत मोरे यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. ‘ अखेरचा जय महाराष्ट्र…
साहेब मला माफ करा’ असं म्हणत वसंत मोरे यांनी मनसे पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना नमस्कार करत फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.
लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे. अशात पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढवून खासदार होण्याची इच्छा त्यांनी आधीच व्यक्त केली आहे. आणि त्यांचे गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे शहरात ‘भावी खासदार’ म्हणून बॅनर चर्चेत आले होते. अशात पुणे लोकसभा मतदार संघातून मनसे नेते साईनाथ बाबर आणि वसंत मोरे इच्छूक उमेदवार होते.
अशात आज सकाळी ‘एका मर्यादेच्या बाहेर त्रास केल्यानंतर माणूस शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा करतो.’ दरम्यान, वसंत मोरे यांनी दोन वाक्यांची पोस्ट लिहिली होती. परंतु ही पोस्ट सोशल मीडियावरच नाही तर पुण्यातील राजकारणात खळबळ उडवणारी ठरली आहे. तर आता वसंत मोरेंनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर ते कुठल्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात मोरे यांनी लिहिलेली भावनिक पोस्टचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. पुण्यात मनसेमध्ये अंतर्गत गटबाजी? समोर आल्याची चर्चा या पोस्टमुळे सुरु झाली आहे.
Vasant More । वसंत मोरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट चर्चेत
तर नुकतीच वसंत मोरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. कात्रजच्या डेअरी संदर्भातल्या विषयासाठी ही भेट घेतल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हे वाचाल का ?
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी संपूर्ण मंत्रिमंडळासह दिला ‘राजीनामा’