Vasant More । लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींचा वेग आला आहे. त्यातच पुणे जिल्हा पवार कुटुंबियांमुळे सर्वात जास्त चर्चेत आलाय. तर दुसरीकडे पुणे लोकसभा मतदार संघही तेवढ्याच चर्चेत आला आहे. त्याच कारण म्हणजे मनसेचे माजी नेते वसंत मोरे पुणे लोकसभेसाठी मैदानात उतरणार आहेत. त्यातच त्यांनी आपण ज्या दिवशी मैदानात उतरु, त्या दिवशी पुणे लोकसभेचे चित्र बदलणार” असे सूचक वक्तव्य केले आहे तसेच ही लढत एकतर्फी होईल, असा दावा देखील वसंत मोरे यांनी केला आहे.
पुण्याची लढत एकतर्फी होणार Vasant More ।
आगामी लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना वसंत मोरे यांनी, “पुणे लोकसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचे स्पष्ट केलंय. त्यासाठीच आपण मनसेतून बाहेर पडलोय असा खुलासा त्यांनी केलाय. ज्या दिवशी मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, त्या दिवशी शहरातील चित्र बदलले असणार आहे. त्यानंतर ही निवडणूक एकतर्फी कशी होईल, हे तुम्हाला दिसेल असा दावा देखील त्यांनी केलाय.
योग्य वेळी योग्य निर्णय Vasant More ।
निवडणुकीच्या प्रचाराविषयी प्रश्न विचारला असता वसंत मोरे यांनी,”योग्य वेळी योग्य निर्णय आपण जाहीर करणार आहोत. मला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली नाही तरी मी निवडणूक लढणार. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढलो तरी पहिल्या क्रमांकावर असणार आहे. यापूर्वी मुरलीधर मोहोळ महापौर होते आणि मी विरोधी पक्षनेता होतो. ज्या ज्या वेळी संघर्ष त्या त्या वेळी विजय मिळवला.”असे वक्तव्य त्यांनी केले.
पुढे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याविषयी बोलताना , “ही लढत एकतर्फी होईल. परंतु चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे मला भाजपची ऑफर दिली होती”असे स्पष्टीकरण मोरे यांनी दिलंय. भाजपमध्ये या तुम्हाला निवडून आणू, असे जाहीर कार्यक्रमात चंद्रकांत पाटील म्हणाले होते, याची आठवण त्यांनी करुन दिली. आपण मनसे आणि भाजप युती, राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासंदर्भात काहीच बोलणार नाही, असे वसंत मोरे यांनी म्हटले.
हेही वाचा
पुण्यात राजकीय घडामोडींना वेग… वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला; पक्ष प्रवेश कधी होणार पाहा….