Prakash Ambedkar । देशभरातील लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मात्र अद्याप महायुतीच्या जागा वाटपबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. तर काही दिवसांपूर्वीच भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
मात्र उर्वरित 28 जागांचे उमेदवार अजून जाहीर झालेली नसल्याने विविध उमेदवारांची नावे समोर येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडातील जागा वाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीतील नेत्यांसह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर गेल्या काही दिवसापासून काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटातील नेत्यांवर टीका करतांना दिसत आहे.
अशात पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी पक्षाने X वर प्रणिती शिंदे यांचा फोटो शेअर करत नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे? असा प्रश्नच काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांना विचारला आहे.
Prakash Ambedkar । नेमकी काय आहे वंचित बहुजन आघाडी पक्षाने शेअर केलेली पोस्ट
” ताई, तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक. आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही. आम्ही महाराष्ट्रातील वंचित – बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो. असो, या सर्व गोष्टी बंद करा. तुम्ही ठीक आहात? आम्हाला समजले आहे की, इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे तुमच्या पक्षासोबत जमत नाही. नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे? ”
ताई, तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक.
आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही.
आम्ही महाराष्ट्रातील वंचित – बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो.
असो, या सर्व गोष्टी… pic.twitter.com/vifYxfMQ2Q
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 18, 2024
हे वाचाल का ? राज ठाकरे महायुतीत जाणार ? रोहित पवार म्हणाले,’धाडसीपणाने लढणाऱ्या नेत्यांनी घाबरून…’