Onion Export: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी देत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. 2023-24 मध्ये 2023-24 मधील खरीप आणि रब्बी पिकांचा अंदाज कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेली मागणी या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.
महाराष्ट्र हा देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक असल्याने निर्यातीसाठी कांद्याचा मोठा पुरवठादार आहे. त्यामुळे सरकारच्या निर्यात बंदीमुळे येथील शेतकरी वर्ग नाराज होता. आता निर्यातीवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याव्यतिरिक्त, सरकारने 2000 मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे, विशेषत: मध्य पूर्व आणि काही युरोपीय देशांमध्ये निर्यात बाजारपेठेसाठी या कांद्याची लागवड केली जाते. पांढऱ्या कांद्याचा उत्पादन खर्च जास्त असतो.
Centre allows export of 99,150 MT onion to six countries Bangladesh, UAE, Bhutan, Bahrain, Mauritius and Sri Lanka. pic.twitter.com/rQuo2APFoP
— Press Trust of India (@PTI_News) April 27, 2024
दरम्यान, याआधी ऑगस्टमध्ये सरकारने देशांतर्गत साठा राखण्यासाठी आणि भाव वाढू नये म्हणून कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावले होते. ऑक्टोबरमध्ये नवरात्रीनंतर देशभरात कांद्याचे भाव झपाट्याने वाढू लागले आणि अवघ्या आठवडाभरात ते दुप्पट झाले होते. त्यानंतर, ग्राहकांवरील भार कमी करण्यासाठी, सरकारने 27 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) आणि NAFED सारख्या सरकारी विक्री केंद्रांद्वारे 25 रुपये प्रति किलो दराने कांद्याची विक्री सुरू केली होती. चालू आर्थिक वर्ष 2023-24 साठी सरकारने 5 लाख टन कांद्याचा साठा बफरमध्ये ठेवला आहे. याशिवाय, साठा आणखी 2 लाख टनांनी वाढवून 7 लाख टन करण्याच्या योजनेवरही सरकारने काम केले आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षातील निर्यातीची आकडेवारी पाहिली असता आर्थिक वर्ष 2016 मध्ये 1.4 दशलक्ष मेट्रिक टन, 2017 मध्ये 2.4, 2018 – 1.6, 2019 – 2.18, 2020 – 1.5, 2021 – 1.58, 2022- 1.54 दशलक्ष मेट्रिक टन कांद्याची भारतातून इतर अनेक देशांमध्ये निर्यात झाली आहे.