नाशिक – नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज यांनी नुकताच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल २६ एप्रिलला पहिलाच दिवस होता. अशात काल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या लढणार आहे. शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांची मालमत्ताही समोर आली आहे.
जाणून घेऊया त्यांची ऐकून संपत्ती
-महाराज यांच्याकडे 9 गाड्या आहेत.
-मठ आणि गुरुकुल आहेत.
-शांतिगिरी महाराजांकडे एकूण 38 कोटी 81 लाख 53 हजार 339 रुपयांची मालमत्ता आहे.
– महाराजांकडे एकूण 38 कोटी 81 लाख 53 हजार 339 रुपयांची मालमत्ता आहे. तर 50 हजार रुपये रोख रक्कम आहे. त्यांच्याकडे एकूण नऊ वाहने आहे. त्यामध्ये टाटा सफारी कारसह दुचाकी, डंपर, स्कूलबस आणि मालवाहू वाहने आहेत. त्याची एकूण किंमत 67 लाख 91 हजार 486 रुपये इतकी आहे.
बारा बँकेत खाती
शांतिगिरी महाराज यांनी एलआयसी पॉलिसीत दोन लाख 40 हजार 870 रुपयांची गुंतवणूक केली आहे.
संभाजीनगरमधील एका बँकेचा 3 हजार 750 रुपयांचा आणि नाशिकमधील एका बँकेत 12 हजार 100 रुपयांचे शेअर्स आहेत.
शांतिगिरी महाराजांचे एकूण बारा बँकेत खाती आहेत.
त्यातील एकूण रक्कम 70 हजार 458 रुपये आहे. त्यांच्याकडे 71 लाख 68 हजार 664 रुपयांची जंगम मालमत्ताही असल्याचं आढळून आलं आहे.
महाराजांकडील मालमत्तेत मठ, गुरूकुल आणि शेतीचाही समावेश आहे.