मुंबई – अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूर त्यांच्या आगामी ‘बावल’ चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. 21 जुलैपासून अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणाऱ्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कलाकार व्यस्त आहेत. वरुण आणि जान्हवीने दिग्दर्शक नितेश तिवारीसोबत दुबईमध्ये चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला.
‘बावल’ ही इमोशनल टच असलेली जोडप्याची अनोखी रोमँटिक कथा आहे. आता, जान्हवी कपूरने वरुण धवनसोबत फोटोशूट शेअर केला आहे, ज्याने चाहत्यांना त्यांच्या सिझलिंग केमिस्ट्रीने प्रभावित केले आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.
‘बावल’च्या रिलीजपूर्वी, जान्हवीने वरुण धवनसोबतच्या फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले. ती यामध्ये थोड्या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे, तर वरुण पांढर्या टी-शर्टमध्ये काळ्या लेदर जॅकेटसह पोझ देत आहे. यातील एक फोटोत वरुण जान्हवीचे कान चावताना दिसत आहे.
वरुण धवन त्याच्या वेब सीरिजमध्ये प्राइम व्हिडिओच्या ‘सिटाडेल’ फ्रेंचायझीच्या भारतीय आवृत्तीमध्ये दिसणार आहे. याचे दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केले असून यात सामंथा रुथ प्रभू देखील आहेत. वरुणने त्याच्या पुढील अॅक्शन थ्रिलरसाठी अॅटलीसोबत हातमिळवणी केली आहे. दरम्यान, जान्हवी कपूर पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘देवारा’मध्ये सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसोबत दिसणार आहे. ती राजकुमार राव सोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या स्पोर्ट्स ड्रामामध्ये काम करत आहे.