Atisha Naik | अभिनेत्री अतिशा नाईक यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. अतिशा नाईकने नायिका ते खलनायिका अशा भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आता त्या पुन्हा एकदा नव्या मालिकेत झळकणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचे’ या मालिकेत त्या खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.
स्टार प्रवाहवर 27 मे पासून ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवी मालिका सुरू होत आहे. पंढरपुरच्या मातीत रंगलेली रांगडी प्रेम कहाणी यात दाखवण्यात येणार आहे. यात अभिनेत्री अतिशा नाईक यांच्या व्यक्तिरेखेचं नाव शशीकला आहे. अभिनेत्री होण्याचं शशीकलाचं स्वप्न होतं. मात्र हे स्वप्न अधुरच राहिलं. त्यामुळे नटण्याची तिला प्रचंड आवड आहे. स्वार्थी आणि पैशांचा माज दाखवणारी अशी त्यांची यात भूमिका असणार आहे. Atisha Naik |
अतिशा नाईकने या भूमिकेबाबत सांगितले की, “मी आजवर अनेक खलनायिका साकारल्या. मात्र शशीकलाची व्यक्तीरेखा वेगळी आहे. तिची घरात प्रचंड दहशत आहे. तिच्या पेहरावातून, चालण्यातून, बोलण्यातून याची कल्पना येते. मला खात्री आहे शशीकलाचा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच भावेल,” असा विश्वास अतिशा नाईकने व्यक्त केला. ही नवी मालिका 27 मे पासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. Atisha Naik |
अतिशा नाईक यांच्याशिवाय ‘बिग बॉस मराठी’फेम लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे स्टार प्रवाहच्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत झळकणार आहे. मालिकेत तो इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा:
न्यायालयाने ओबीसी प्रमाणपत्र रद्द केल्यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘मी न्यायालयाचा आदेश मानणार नाही’