Actor Varun Sood| अभिनेता वरूण सूदच्या मेंदूला दुखापत झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती सांगितली आहे. याशिवाय त्याने सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी त्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
वरूण सूदने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “हॅलो, मला ब्रेनमध्ये कनकेशन झालं आहे. मी काही दिवस कोणत्याही संदेशांना प्रतिसाद देऊ शकणार नाही. मला स्क्रीन टाइम कमी करण्यास सांगितले आहे. मी लवकरच परत येईन.” वरुणची ही पोस्ट सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत आहे. वरुण सूदचे चाहते चिंतेत पडले असून ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. मात्र, त्याने मेंदूला इजा कशी आणि कुठे झाली हे त्याने पोस्टमध्ये सांगितले नाही. Actor Varun Sood|
दरम्यान, कनकेशन हा एक प्रकारचा मेंदूला झालेला आजार आहे, ज्यामध्ये मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यात अडचण येते. गोष्टींवर नीट लक्ष केंद्रित करता येत नाही. गोष्टी लक्षात ठेवणे किंवा समतोल राखण्यात खूप अडचण येते. वरुण सूदच्या आजारपणाने चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, त्याने लवकर बरा होऊन पुनरागमन करावे, अशी चाहत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. Actor Varun Sood|
वरुणने 2019 मध्ये ऑल्ट बालाजीच्या रागिनी एमएमएस या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर तो अनेक टीव्ही शोमध्ये दिसला. वरुण सूद ‘रोडीज’ आणि ‘स्प्लिट्सविला’ सारख्या रिॲलिटी शोचा भाग आहे. 2022 मध्ये रिलीज झालेल्या करण जोहरच्या ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटात तो एका छोट्या भूमिकेत दिसला होता. वरुण शुडला खरी ओळख रवीना टंडनच्या प्रसिद्ध वेब सीरिज कर्मा कॉलिंगमधून मिळाली. या शोमध्ये त्याला खूप पसंती मिळाली.
हेही वाचा:
500-600 नाही तर 1000 कोटी रुपये कमवेल, आयुष्मान खुरानाचे बॉर्डर 2 सह ‘हे’ सहा चित्रपट