सनिश व दीपितच्या कामगिरीमुळे रेंजर्स उपांत्यफेरीत

मुंबई – वेस्ट कोस्ट रेंजर्स संघाने आपल्या फॉर्म कायम ठेवत युटीटी मुंबई सुपर लीग स्पर्धेत ब्लेझिंग बॅशर्स संघाला पराभूत करत उपांत्यफेरीत धडक मारली. मुंबईच्या एनएससीआय येथे ही स्पर्धा सुरू आहे. सनिश आंबेकर आणि दीपित पाटील यांनी जोरदार कामगिरी करत 14-13 असा विजय संघाला मिळवून दिला. त्यामुळे चार टायनंतर संघाने 67 गुणांची कमाई करत बाद फेरीत धडक मारली.

सनिशने आपल्या दोन्ही सामन्यात चमक दाखवली तर, दीपितने शेवटच्या टायमधील शेवटच्या ामन्यात निर्णायक विजयाची नोंद केली.बॅशर्सचे तीन टायनंतर 37 गुण झाले आहेत व आपले आव्हान टिकवायचे असल्यास मोठ्या विजयाची त्यांना गरज आहे.

रेंजर्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अभय मेहताला गुरचरण सिंग गिलकडून 0-3, वेट्रन्स सामन्यात पराभूत व्हावे लागले. सनिशने पुरुष एकेरीच्या लढतीत रिगन अलबुक्‍युरेक्‍यूला 2-1 असे पराभूत केले. पण, रेंजर्सच्या मानसी चिपळूणकरला श्रुती अमृतेकडून महिला एकेरीच्या लढतीत 1-2 असे पराभूत व्हावे लागले.ज्युनिअर मिश्र दुहेरीत दिपीत पाटील व संपदा भिवंडकर यांना देखील आदिल आनंद व तेजल कांबळे जोडीकडून 1-2 पराभूत व्हावे लागले.

देव हिंगोरनेने मर्व्हन पटेलला 3-0 असे नमवित चमक दाखवली.सनिशने मानसीसोबत खेळत रिगन अलबुक्‍यूरेक्‍यु व श्रुती अमृते जोडीला 2-1 असे पराभूत करत सामना 9-9 असा बरोबरीत आणला. रेंजर्सला पुढच्या दोन्ही लढतीत पराभूत व्हावे लागले. संपदा भिवंडकरला तेजल कांबळेने मुलींच्या ज्युनिअर गटात 1-2 असे पराभूत केले.

तर, अभय मेहता आणि देव हिंगोरने जोडीला (वेट्रन्स व कॅडेट) गुरचरण सिंग गिल व मर्व्हन पटेल 1-2 यांकडून पराभवाचा सामना करावा लागला. पण, युवा दीपित पाटीलने अीादल आनंदला 3-0 असे पराभूत केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.