नगर शहराच्या रस्त्यांवरील खड्डे कधी भरणार?

नागरिकांना दलदलीतूनच वाहतूक करावी लागणार

नगर: नगर शहरातील सगळेच रस्ते काही दिवसांपुर्वी खोदले होते. तर काही रस्त्यांवर अद्याप काम सुरू आहे. फेज-2 च्या कामासाठी, डेनेजच्या अथवा अंडरग्राउंड केबलच्या कामासाठी हे रस्ते खोदण्यात आले होते. मात्र आता पावसाळा तोंडावर आला असून या रस्त्यांचे पॅचिंगचे काम हाती घेण्यात आले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नगरकरांना खचलेल्या रस्त्यातूनच ये-जा करावी लागणार हे नक्की.

उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौकातच काही महिन्यांपूर्वी खोदकाम करण्यात आले. त्या नंतर तहसिल कचरीे समोरील रस्ता खोदण्यात आला. तसेच पुढेजावून जॉगिंग पार्क जवळील रस्ता खोदण्यात आला मात्र लाम झाल्यानंतरया रस्त्यांच्या पॅचिंगचे लाम मात्र हाती घेण्यात आले नाही. तीच अवस्था शहरातील रस्त्यांची असून शहराच्या मध्यवस्तीतील जवळपास सर्वच रस्ते या-ना-त्या लारणाने खोदले. त्यात चौपाटी कारंजा, कोर्ट गल्ली, आनंदी बाजार, तेलीखुंट, सर्जेपुरा, रामचंद्र खुंट, धरतीचौक, बंगाल चौक, घुमरे गल्ली आदी रस्ते खोदण्यात आले होते काम झाल्यानंतर या खड्यांत फक्त माती ढकलण्यात आली असल्याने पावसाळ्यात ती माती वाहून जाईल अथवा जागच्या जागी खचेल आणि त्याचा चिखल मोठ्या प्रमाणावर होणार असून नागरिकांना याच रस्त्याने ये-जा करावी लागणार आहे.

या संदर्भात महापालिकेचे अभियंता सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मध्यंतरी महापालिकेला उपलब्ध झालेल्या 10 कोटी रुपयांच्या निधीतून फेज -2 च्या जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र काम झाल्यानंतर रस्त्याचे पॅचिंग चे काम हे सार्वजनिक बांधकामच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगितले. या कामांबाबतच्या निविदा प्रक्रियाही पार पडल्या असून कार्यारंभ आदेश देण्यात आला अथवा नाही हे मात्र माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या खासगी केबल टाकण्याचे काम करण्यात आले त्यांनी रस्त्याच्या खोदाई पोटी नगरपालिकेकडे नुकसानभरपाई भरली आहे. तसेच केडगाव परिसरातील काही रस्त्याची तसेच आगरकरमळा, माणिक नगर, याभागातील रस्त्यांचे पॅगिचे काम झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तथापी केडगाव परिसरातील काही रस्त्यांची अवस्था खुपच दयनीय असल्याचे निदर्शनास आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.