अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करणार भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी

पुढच्या आठवड्यात ट्रम्प-मोदींची होणार भेट

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्याचा पुढाकार घेतला आहे. व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी याविषयी माहिती दिली. ‘मी पुढच्या आठवड्यात नरेंद्र मोदींना भेटणार आहे. तसेच, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबत बैठक करणार आहे. दोन्ही देशातील तणाव कमी झाला आहे, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली.

22 सप्टेंबर रोजी अमेरिकेमध्ये ‘हाउडी मोदी’ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प सहभागी होणार आहे. या दरम्यान पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतीय समुदायाला संबोधित करणार आहे. या कार्यक्रमापूर्वी डोनाल्ड ट्रम यांनी, ‘भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांची लवकरच भेट घेणार आहे. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने बरीच प्रगती झाली आहे.’असे म्हटले. दरम्यान, ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची कधी भेट घेणार आहे हे नाही सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमानुसार ते न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेदरम्यान पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट घेऊ शकतात. जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या मुद्द्यावरुन दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करणार असल्याचे सांगितले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.