पुणे – कोंढवा येथील आर एम डी स्कूल मध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती बहुलेकर व उपमुख्याध्यापिका संध्या नाडगौडा यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहना ने झाली राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रास्ताविक व सूत्रसंचालन पूजा लाड यांनी केले. विठ्ठल म्हेत्रे यांनी महाराष्ट्र दिन व भाग्यश्री पोटे यांनी कामगार दिनाविषयी माहिती सांगितली. गणेश गुंड ,विठ्ठल म्हेत्रे,राणीशा कदम ,जयश्री साळुंखे, अमृता गुरव, सीमा चौगुले ,सारिका कोरे ,पूजा लाड यांनी पोवाडा सादर केला.
अर्चना कुलकर्णी , शितल शिंगटे यांनी महाराष्ट्र भक्ती गीत सादर केले. मुख्याध्यापिका स्वाती बहुलेकर यांनी महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास व महाराष्ट्राचे देशासाठी योगदान ,भविष्यातील आव्हाने व राज्याच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे याविषयी विचार मांडले.
उपमुख्याध्यापिका संध्या नाडगौडा यांनीही महाराष्ट्र दिनाविषयी माहिती सांगितली अलका गावडे यांनी आभार प्रदर्शन केले. सर्व शिक्षिका शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.