Lok Sabha Election 2024 । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांच्यावर टीका केली या वयात कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला काय सांभाळणार? असा सवालही मोदींनी यावेळी उपस्थित केला. यावर आता शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सडेतोड उत्तर दिले आहे.
‘कुटुंब सांभाळण्याची भाषा आपल्या तोंडून शोभते का? असा प्रश्न त्यांनी मोदींना विचारला आहे. लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशी मोदी यांची गत झाली आहे, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.
रोहित पवार यांचे ट्विट
आदरणीय मोदी साहेब,#कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभते का?
“लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण” अशी तुमची गत आहे….पत्रकारांना कधीही सामोरे न जाणाऱ्या आपल्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्रासाठी एक स्पेशल मुलाखत करावी लागतेय, यावरूनच मराठी… pic.twitter.com/u9waWrlX8g
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 2, 2024
हे वाचले का ? ‘या’ वयात कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला काय सांभाळणार? मोदींचा पवारांवर घणाघात