IPL 2024 Playoff : आयपीएल 2024 चा पहिला क्वालिफायर 21 मे रोजी खेळवला जाईल. यानंतर 22 मे रोजी एलिमिनेटर सामना होणार आहे. या हंगामातील अंतिम सामना 26 मे रोजी होणार आहे. पण यावेळी प्लेऑफचा थरार कमी होऊ शकतो. इंग्लंडचे 8 खेळाडू प्लेऑफ सामन्यात खेळू शकणार नाहीत. यामुळे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जसह पाच संघांना धक्का बसणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने नुकतीच याबाबत माहिती दिली आहे.
खरंतर, इंग्लंडने नुकताच टी-20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला आहे. हा संघ पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिकाही खेळणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात चार सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. ही मालिका 22 मे पासून सुरू होणार आहे. या कारणामुळे इंग्लंडचे खेळाडू आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळू शकणार नाहीत. निवडलेल्या खेळाडूंना प्लेऑफपूर्वी परतावे लागेल.
या मोसमात जोस बटलरने राजस्थान रॉयल्ससाठी चमकदार कामगिरी केली आहे. बटलरने 9 सामन्यात 319 धावा केल्या आहेत. त्याने 2 शतकेही झळकावली आहेत. फिलिप सॉल्टने कोलकाता नाईट रायडर्ससाठी दमदार कामगिरी केली आहे. त्याने 9 सामन्यात 392 धावा केल्या आहेत. पंजाब किंग्जकडून जॉनी बेअरस्टोने चांगली कामगिरी केली आहे. त्याने 8 सामन्यात 250 धावा केल्या असून यात एका शतकी खेळीचा समावेश आहे. मात्र हे खेळाडू प्ले ऑफमध्ये खेळू शकणार नाहीत.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना 22 मे रोजी लीड्समध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर मालिकेतील दुसरा सामना 25 मे रोजी बर्मिंगहॅम येथे होणार आहे. टी-20 मालिकेतील तिसरा सामना 28 मे रोजी कार्डिफ येथे होणार आहे. तोच शेवटचा सामना लंडनमध्ये होणार आहे. हा सामना 30 मे रोजी होणार आहे.
‘या’ पाच संघांमधून ‘हे’ खेळाडू माघारी परतणार….
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर
चेन्नई सुपर किंग्ज : मोईन अली
कोलकाता नाइट रायडर्स : फिल सॉल्ट
पंजाब किंग्स : सॅम करन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : विल जॅक, रीस टोपली