ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’

वॉशिंग्टन : जेम्स बॉन्ड किंवा मिशन इम्पॉसिबल सारख्या चित्रपटात आपण गुप्तचरांची कामगिरी पाहतो. त्यावेळी प्रत्यक्षात असे घडत असेल का? असा सवाल आपणास पडत असतो. मात्र प्रत्यक्षात असे प्रसंग गुप्तचरांच्या आयुष्यात घडत असतात. भारताच्या भेटीवर येणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभोवती असे शेकडो स्त्री पुरूष असतात. त्यांच्या यशाबद्दल त्यांची कोणी पाठ थोपटत नाही किंवा त्यांच्या सन्मानार्थ कोणी पार्टी देत नाही. ते आपल्या यंत्रासह या कामात स्वत:ला झोकून देत असतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेथे भेट देणार आहेत, तेथे एक महिना आधी अमेरिकेचे गुप्तचर दाखल होतात. कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी राष्ट्राध्यक्षांना धोका होणार नाही याची खातरजमा ते करतात. ते आपला अहवाल अमेरिकेला पाठवतात. त्यानंतर दोन आठवड्यांनी दुसरे पथक या स्थानांना भेट देते. तेथील जागेची कसून पहाणी करते. या दोन्ही अहवालांच्या मदतीने मग शेकडो माणसे आणि यंत्रे आपले मोर्चे सांभाळतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वापरत असलेल्या मोटारीचा आणि सुरक्षा आणि दळण वळणाच्या साधनांचाही त्यात समावेश असतो. त्यानंतर अमेरिकेचे के-9 हे पथक येते. या पथकात अति उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिलेल्या श्‍वान पथकाचा समावेश असतो. हे श्‍वान आणि त्यांचे हॅंडलर राष्ट्राध्यक्षांना मारण्यासाठी कोणताही बॉम्ब पेरला नाही याची खातरजमा करतात.

सुरक्षेची पुढील पायरी म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेथे राहतात त्या हॉटेलची सुरक्षा व्यवस्था. अमेरिकन गुप्तचर खात्याचे सदस्य त्या इमारतीचा इंच न्‌ इंच तपासतात. त्या हॉटेलची सर्व माहिती मिळवली जाते. तेथेच सुरक्षिततेची कोणती कमतरता यापुर्वी राहिली आहे का? याचा इतिहासही तपासला जातो. त्या हॉटेलमधील कर्मचारी कोणत्या गटात समाविष्ट आहे का? हेही पडताळून पाहण्यात येते. थोडक्‍यात तपशीलवार विश्‍लेषण करण्यात येते.

राष्ट्रपतींच्या आगमनापुर्वी त्यांची कॅडॅलिक मोटार आणि अधिकृत हेलिकॉप्टर यांचे आगमन होते. त्यानंतर अतिरिक्त गुप्तचरांचा ताफा त्या देशांत दाखल होतो. या सर्व प्रक्रिया भारतात पार पाडल्या आहेत.

राष्ट्राध्यक्ष येतात तेंव्हा…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष येण्याआधी विमानतळाच्या सुरक्षेव्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येते. राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत विमान लॅंन्ड होण्याआधी हा सर्व प्रदेशात उड्डाणांना बंदी घालण्यात येते. म्हणजे हे विमान उतरत असतातना कोणत्याही अन्य विमानाला या विमानतळावर उतरता येत नाही अथवा उड्डाण करता येत नाही. विमान उतरताच अमेरिकेचे गुप्तचर राष्ट्राध्यक्षांच्या निवास असणारे हॉटेल ते विमानतळ या रस्त्याचा ताबा घेतात. त्या मार्गावर कोणते रूग्णालय असेल तर काही मार्गदर्शक सुचना गुप्तचरांकडून आधी देण्यात येतात.

राष्ट्राध्यक्षांची मोटार रस्त्यावर असते त्यावेळी या रस्त्यावे गुप्तचर विशेष लक्ष ठेवतात. त्यांच्याकडे काही खास जॅमर असतात. त्याद्वारे ते कोणताही बॉम्बस्फोट अथवा कोणत्याही स्वरूपातील स्फोटके रोखू शकतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेथे राहणार आहेत तेथे तर या गुप्तचरांची लगबग बघण्यासारखी असते. ते स्वयंपाक घरात राष्ट्राध्यक्षांवर विषप्रयोग होऊ नये, यासाठी जातीने लक्ष ठेवून असतात. तेथे सुरक्षा व्यवस्था एवढी कडेकोट असते की लिप्टमन म्हणून हेच गुप्तचर कामगिरी बजावत असतात.

आपल्या देशाचे सन्माननीय पाहूणे म्हणून भारतीय गुप्तचरही तेवढीच काळजी घेत असतात. सुरक्षेच्या अंतर्गत वर्तुळात अमेरिकेचेच गुप्तचर आणि जवान असले तरी भारतीय गुप्तचरांच्या मदती शिवाय ही सुरक्षा व्यवस्था अपुरी राहणार आहे, याची त्यांनाही कल्पना असते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.