Asaduddin Owaisi Vs Madhavi Lata| – हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार माधवी लता यांची सुरक्षा केंद्र सरकारने वाढवली आहे. गुप्तचर विभागाच्या अर्थात आयबीच्या अहवालानंतर माधवी लता यांच्या सुरक्षेत ११ कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
सोशल मीडियावर त्या हिंदुत्वाच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात आणि तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर त्यांनी केलेल्या विधानांमुळे त्या विशेष चर्चेत आल्या होत्या. एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. तसेच आयबीच्या अहवालानंतर त्यांच्या सुरक्षेला असलेला धोका ध्यानात घेत माधवी लता यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
थेट ओवेसी यांच्याच विरोधात भाजपने उमेदवारी दिल्यामुळे माधवी लता तेलंगणात आणि आंध्र प्रदेशात प्रकाशझोतात आल्या आहेत. कट्टर हिंदुत्ववादी नेत्या अशी त्यांची प्रतिमा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांची प्रशंसा केली आहे.
कोण आहेत माधवी लता? Asaduddin Owaisi Vs Madhavi Lata|
पेशाने डॉक्टर असलेल्या माधवी लता विरिंची येथे एक रूग्णालय चालवतात. त्या भरतनाट्यमच्या नृत्यांगनाही आहेत व त्यांना कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नाही. तिहेरी तलाकची प्रथा संपुष्टात यावी यासाठी त्यांनी मुस्लिम महिलांच्या गटांना सहकार्य केले होते.
हैदराबाद मतदारसंघ आवेसी यांचा बालेकिल्ला मानला जातो. १९८४ पासुन ही जागा ओवेसी कुटुंबाच्या ताब्यात आहे. त्यांचे पिता सुल्तान सलाहुद्दीन ओवेसी हे पहिल्यांदा येथून विजयी झाले होते. २० वर्षे ते खासदार होते. त्यानंतर ओवेसी या जागेचे प्रतिनिधित्व करत आहेत. Asaduddin Owaisi Vs Madhavi Lata|
हेही वाचा:
PM मोदींविरोधात कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार; नेमकं काय घडलं?