कुआला लम्पुर : वीरदीप सिंहच्या फलंदाजीच्या आणि फितरी शाम , पवनदीप सिंह यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर मलेशियाने दुस-या टी-२० सामन्यात हाँगकाँगवर ३५ धावांनी विजय मिळवला. यासह मलेशियाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. मलेशियाचा वीरदीप सिंह सामन्याचा मानकरी ठरला.
And that's that. HK finish on 103/8 in their 19 overs, and lose by 35 runs to @MalaysiaCricket. We've gone 0-2 down in the 5-match #InterportT20I series.
The next match is on Sunday, 7:30 PM. Join us then.#MALvHK @FanCodeIndia
— Cricket Hong Kong, China (@CricketHK) February 21, 2020
मलेशियाने टाॅस जिंकत प्रथम फलंदाजी करताना वीरदीप सिंहच्या ४६(४०), अहमद फैजच्या २१(१७), सैयद अजीजच्या २१(१९) आणि शरविन मुनियंडीच्या नाबाद १६(७) धावांच्या खेळीच्या जोरावर १९ षटकांत ६ बाद १३८ अशी मजल मारली होती. हाँगकाँगकडून अफताब हुसैन, ऐजाज खान यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात विजयासाठी १३९ धावांचा पाठलाग करताना हाँगकाँगला १९ षटकात ८ बाद १०३ धावसंख्येपर्यतच मजल मारता आली. हाँगकाँगकडून वकास बरकतने ३५(२९) आणि ऐजाज खानने ३१(२८) धावांची खेळी केली. मलेशियाकडून फितरी शाम आणि पवनदिप सिंहने प्रत्येकी ३ तर स्याजरूल इद्रसने १ गडी बाद केला.