वॉशिंग्टन – ग्रॅण्डस्लॅम टेनिसमधील एक मानांकित स्पर्धा असा उल्लेख होणारी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेबाबत (युएस ओपन) येत्या जूनमध्ये निर्णय घेतला जाणार असल्याचे अमेरिका टेनिस संघटनेच्या संयोजन समितीने जाहीर केले आहे.
करोनामुळे ऑलिम्पिकसह अनेक मोठ्या स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. तसेच ग्रॅण्डस्लॅममधील सर्वात प्रतिष्ठेची विम्बल्डन टेनिस स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे युएस टेनिस स्पर्धेबाबत काय होणार असा प्रश्न टेनिसपटूंना पडला होता, त्यावर संघटनेने आपले मत व्यक्त केले आहे.
विम्बल्डन रद्द झाली आहे तर, फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा देखील पुढे ढकलण्यात आली आहे. ही स्पर्धा लवकरच नव्या वेळापत्रकानुसार सप्टेंबरमध्ये खेळविण्यात येणार आहे. जूनमध्ये परिस्थितीचा आढाव घेतल्यानंतरच युएस टेनिस स्पर्धेबाबत निर्णय जाहीर करण्यात येईल असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.