उत्तर प्रदेश – देशात सध्या एकच मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे पाच राज्यांच्या निवडणुका… मात्र, यामधील सर्वाधिक लक्ष हे उत्तर प्रदेशच्या निकालाकडे असणार आहे. या पाच राज्यांना मिनी लोकसभा म्हटले जाते. त्यामुळे निकालाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
उत्तर प्रदेशात सकाळी 8 वाजल्यापासून सर्व 75 जिल्ह्यांमध्ये मतमोजणीस सुरुवात झाली आहे. आता उत्तर प्रदेशात कोण सत्ता स्थापन करणार याचा फैसला काही तासातच होणार आहे. योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव, चंद्रशेखर आझाद रावण यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Uttar Pradesh set for counting of votes from 8 am; Visuals from Varanasi#UttarPradeshElections2022 pic.twitter.com/K9jld5ljDs
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 10, 2022
उमेदवारांची नावे –
योगी आदित्यनाथ (भाजप) – गोरखपूर शहर
चंद्रशेखर आझाद रावण (भीम आर्मी) – गोरखपूर शहर
अखिलेश यादव (सपा)- करहल
एस.पी. बघेल (भाजप)- करहल
केशव प्रसाद मौर्य (भाजप- सिराथू
डॉ. पल्लवी पटेल (सपा)-सिराथू
शिवपाल यादव (सपा)- जसवंतनगर
आझम खान (सपा)- रामपूर
ओमप्रकाश राजभर (सपा+) – जहुराबाद
Counting of votes begin for Assembly elections in five States including Uttar Pradesh pic.twitter.com/i27mN8EoIv
— ANI (@ANI) March 10, 2022
निवडणुकांमधील चर्चेचे मुद्दे –
राम मंदिर निर्माण
शेतकरी आंदोलन
हाथरस बलात्कार प्रकरण
लखीमपूर हिंसाचार
गंगा किनाऱ्यावरचे मृतदेह