नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. आज दुपारपर्यंत सर्वच राज्यातील निकालांचा कल स्पष्ट होईल.
दरम्यान, पंजाबमध्ये आपला ४३ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर तिकडे गोव्यात भाजपशी बंडखोली केले उत्पल पर्रिकर पिछाडीवर असल्याचे सुरुवातीच्या कलांमध्ये दिसून येत आहे.
#PunjabElections2022 | Early trends – Aam Aadmi Party-6, Shiromani Akali Dal-2, Bharatiya Janata Party-1 & Others-2, as per Election Commission pic.twitter.com/l9ETgqWql6
— ANI (@ANI) March 10, 2022
पंजाबमध्ये गेले काही महिने मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, नंतर चरणजित सिंग चन्नी मुख्यमंत्री झाले आणि अमरिंदर सिंग यांनी वेगळा पक्ष काढत भाजपासोबत हातमिळवणी केली. तर, आम आदमी पक्षाने पंजाबमधील निडवणूक चुरशीची केली होती. त्यामुळे आपला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.