युक्रेनने पूर्व युक्रेनमध्ये पाच रशियन विमाने आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानुसार युक्रेनवर हे हल्ले करण्यात आले. युक्रेनमध्ये रशियन हल्ल्यात 40 हून अधिक युक्रेनियन सैनिक आणि 10 नागरिक ठार झाले आहेत.
*युक्रेनचे म्हणणे आहे की, त्यांनी ताबा मिळवण्यासाठी आलेले 50 रशियन सैनिकांना मारले आहे. अनेक बाजूंनी रशियन सैन्याने युक्रेनमध्ये प्रवेश केल्यानंतर काही तासांनंतर ही घोषणा झाली.
*रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हंटले आहे कीस युक्रेनचा हवाई तळ, हवाई संरक्षण यंत्रणा शस्त्रांसह नष्ट केली आहे.
*युक्रेनने देशाच्या पूर्व भागात पाच रशियन विमाने आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. लष्कराच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, “जॉइंट फोर्स कमांडनुसार, आज 24 फेब्रुवारी रोजी, संयुक्त दलाच्या ऑपरेशनमध्ये हल्ला करण्यासाठी आलेले 5 विमान आणि एक हेलिकॉप्टर पाडण्यात आले आहे.”
*युक्रेनचे उप गृहमंत्री अँटोन गेराश्चेन्को यांनी सांगितले की, रशियाने राजधानी कीव, खारकोव्ह आणि डनिपरमध्ये लष्करी मुख्यालये, विमानतळ, लष्करी गोदामांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.
*राजधानी कीवमध्ये स्फोट होत असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. विमानतळाजवळ गोळीबाराचाही आवाज ऐकू आला आल्याचे सांगितले जात आहे.